तळेरे (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामध्ये करणाऱ्या सिंधुदुर्ग ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोसच्या वतीने पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 व 16 एप्रिल 2024 रोजी निवासी स्वरूपात असणार आहे.
बारावी परीक्षा उत्तीर्ण व बारावी परीक्षेला बसलेल्या तसेच पोलीस सैन्यदलात सहभागी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस, सैन्य या प्रशासकीय सेवेत दाखल व्हावेत यासाठी या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये अकॅडमीचे नामवंत व अनुभवी प्राध्यापक क्रीडा कोच, पोलीस अधिकारी, यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. यासाठी नाव नोंदणीकरिता दि. 12 एप्रिल 2024 पर्यत 7264920062 9075385256/9923833793 यावर संपर्क करावा असे आवाहन गुरुकुल अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.











