राज्यातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करण्यास महायुती सरकार सक्षम

अंबानिंच्या घराबाहेर स्फोटके ठेवून वसुली करणारे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे

सलमान खान घराबाहेरील फायरिंगवर आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबीयांचा सर्वात मोठा अपमान संजय राऊत ने केला

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अभिनेता सलमान खान च्या घराबाहेर काल फायरिंग झाली. राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. फडणवीस हे कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहेत. संजय राजाराम राऊत ने समजून घेतले पाहिजे की हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेले सरकार नाही की अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपती च्या घराबाहेर जिलेटीन कांड्या ठेऊन वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्यांकडून खंडणी वसुली करायची. ह्या वसुली रॅकेटचा विरोधी पक्षनेता म्हणून भांडाफोड केले होते. चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण दिले म्हणणाऱ्या संजय राऊत ने महाविकास आघाडी काळात वरून सरदेसाई ला पोलीस संरक्षण का दिले होते ? माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह भाजपा नेत्यांच्या पोलीस संरक्षणात कशी कपात केली याचाही खुलासा राऊत ने करावा असे आव्हान भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले. भाजपाच्या मोदी गॅरंटी या जाहिरनाम्यावर आज टीका करणाऱ्या संजय राऊत ने मागील 10 वर्षे याच भाजपाच्या जाहिरनाम्याचा जप केला होता. मोदी करिष्म्यावर आपली पोळी भाजताना संजय राऊत ला त्यावेळी भाजपाचा जाहीरनामा तोंडपाठ होता. स्वतःच्या बायकोपेक्षा भाजपच्या जाहिरानाम्याचाच जप राऊत करत होते अशी टीकाही आमदार राणे यांनी केली. मागील 10 वर्षांतील 6 वर्षे मोदींच्या कृपेने राऊत चा मालक उद्धव आपले खासदार निवडून आणत होता. आणि आता संविधान धोक्यात असल्याचे म्हणता ? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा सर्वात मोठा अपमान ह्या संजय राजराम राऊत याने केला आहे.बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर यांना राजकीय चाली करून कसे ताटकळत ठेवले हे अवघ्या राज्याने बघितले आहे. महाविकास आघाडी मध्ये वंचित सामील न होण्याचे कारण संजय राजाराम राऊत असल्याची टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली.

error: Content is protected !!