सम्राट अशोक नगर त्रिंबक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन……!

आचरा (विवेक परब) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आज सम्राट अशोक नगर, त्रिंबक येथे मुबई मंडळाचे सदस्य भाऊ महादेव जाधव यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मंजिरी गणेश जाधव, सुमेध अजय पवार, सानवी विवेक जाधव, स्पृहा अमित पवार, नयन अजय पवार यांनी डॉ. बाबा साहेबांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व सादर केले. प्रा. वीणा सुजय जाधव यांनी विशेष प्रबोधन केले. तसेच मान्यवरानी हि आपले विचार मांडले. यावेळी अध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष विवेक जाधव, सचिव गणेश जाधव, कोषाध्यक्ष मनोहर जाधव, सदस्य संजय पवार, सुजय जाधव, अमित पवार, रामदास पवार, गिरीश पवार, सूरज जाधव, सर्व सभासद, महिला मंडळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी तर समारोप अजय पवार यांनी केला.

error: Content is protected !!