वरवडेतील नितीन मोहन कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे ( हिवाळेवाडी ) येथील युवक नितीन मोहन कदम ( वय 34 ) यांचे 16 एप्रिल रोजी दुपारी अकाली निधन झाले. छातीत दुखू लागल्यामुळे नितीन याना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र उपचारदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी नितीन यांच्या झालेल्या निधनाने वरवडे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे.

error: Content is protected !!