माजी खासदार निलेश राणेंची टीका
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांनी 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळच्या उपस्थितीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर ट्विट करत टीका केली. आपल्या ट्विट मध्ये निलेश राणे म्हणाले की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, आणि काँग्रेस असे मिळून जेमतेम 1200 लोकांनी विनायक राऊत याना समर्थन दिले. एका लहान हॉलमध्ये कार्यक्रम घेऊन विषय संपवला. तसे बघायला गेलं तर हल्ली 1200 लोक जमवणे म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क भरल्यासारखे आहे.












