आचरा (प्रतिनिधी) : देवगड येथे टिळक भवन या ठिकाणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सर्वानुमते सौ. ज्योती जयदीप जाधव यांची देवगड तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सौ. ज्योती जाधव यांना संघटनेचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष योगेश मस्के, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, कणकवली तालुका संघटक तथा स्पेक्टोमार्कचे मालक मंगेश चव्हाण, तसेच देवगड तालुका संघटक श्रीकृष्ण दुधवडकर, सदस्य दिपाली आयरे, मालवण तालुका सदस्य आचरेकर, सुरेखा जोशी, गुरव तसेच देवगड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. ज्योती जाधव यांना पुढील वाटचालीसाठी देवगड तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.













