राजकीय प्रसिद्धीसाठी बालिश बाबूची बडबड

समीर नलावडे यांचा सुशांत नाईक यांना टोला

कणकवली (प्रतिनिधी) : नेहमीप्रमाणेच राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी बालिश बाबू नायकांचा बडबडला. मात्र या वायफळ बडबड करणाऱ्या सुशांत नाईक यांची नारायण राणे यांच्यावर बोलण्याची अगोदर पात्रता नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांचे बंधू आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलताना आता यापुढे त्यांच्या प्रत्येक आरोपांना माझे उत्तर असणार आहे हे देखील लक्षात घ्यावे. मी दिलेल्या आव्हानाला आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी उत्तर द्यावे. अन्यथा दुसऱ्या पदाधिकाऱ्यांमार्फत उत्तर देत सारवा सारव केल्यास त्यांना आमचा पदाधिकारी उत्तर देईल. असा इशारा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे. आमदार वैभव नाईक व त्यांचे बंधू सुशांत नाईक तसेच त्यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे कणकवली शहरात तर सतीश सावंत हे कणकवली शहरा लगत राहतात. असे असताना त्यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर आम्ही कणकवली शहरातून आमचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लीड मिळवून देणार हे आव्हान देतो. धमक असेल तर वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी तारीख व वेळ जाहीर करावी व हे आव्हान स्वीकारावे. व या दोघांनी देखील कणकवली स्वयंभू मंदिर येथे शपथ घेण्यासाठी उपस्थित राहावे. आम्ही जर राणेंना लीड मिळवून दिले तर नाईक बंधुनी राजकीय संन्यास घ्यावा. लीड न मिळाल्यास मी राजकीय संन्यास घेईन असे आव्हान नलावडे यांनी दिले आहे. तेराव्या यादीमध्ये नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली अशी टीका करत असताना सुशांत नाईक यांनी लक्षात ठेवावे की येत्या 4 जूनला त्यांच्या उमेदवाराचे राजकीय तेरावे करण्याची आम्ही तयारी ठेवली आहे. मतदानाच्या माध्यमातून आम्ही या तेराव्या यादीचे उत्तर तेराव्यातून देऊ असा खोचक टोला देखील नलावडे यांनी लगावला आहे. नाईक ज्या शहरात राहतात शहरात त्याना मते मिळत नाहीत. अशावेळी त्यांनी बालिश बडबड करू नये. ज्यांच शहरात कोणी ऐकत नाही ते फक्त राजकीय स्वार्थासाठी जिल्हा व मतदार संघात स्टंटबाजी टोला नलावडे यांनी लगावला. तसेच आमदार वैभव नाईक यांना खासदार विनायक राऊत हे उमेदवार म्हणून नकोच होते. त्यामुळेच ते एवढे दिवस गप्प होते. किरण सामंतांसाठी आमदार वैभव नाईक हे प्रयत्नशील होते. मात्र ते फोल ठरल्यानंतर आमदार नाईक यांनी राणेंवर टीका सुरू केल्याचा गौप्यस्फोट नलावडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!