खारेपाटण व शेर्पे या केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी सेविकांच सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर सन -२०२४-२५ या शैशणिक वर्षी इयत्ता १ ली च्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलासाठी शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून अशाच प्रकारे खारेपाटण जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत देखील खारेपाटण व शेर्पे या दोन केंद्राचा संयुक्तिक केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याचे उद्घघाटन खारेपाटण नं.१ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर,शेर्पे केंद्र शाळेचे मुख्याद्द्यापक दशरथ शिंगारे, नडगिवे शाळा नं.१ मुख्याद्यापक अनिता पाटकर,खैराट – कुरांगवणे शाळेचे शिक्षक बागडी सर,कुरंगवणें भंडारवाडी शाळेचे शिक्षक सखाराम खरात, चिंचवली शाळेचे शिक्षक अमोल भंडारी सर आदी मान्यवर पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.खरेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीच्या आर्वी धीरज जुमलेकर व निर्झरा दीपक कांबळी या दोन विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने कुंकूम तीलक लावून व आरती ओवाळून वतीने स्वागत करण्यात आले.तर त्यांच्या पालकांचे देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या निमित्ताने शाळा प्रवेश संदर्भात जनजागृती फेरी काढण्यात आली.यामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी सहभाग घेतला होता.तर या मेळाव्याला अनिल खोत, संदीप कदम, आमरीन शेख, आरती जोजन या शिक्षकांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली होती.
“जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुलांना दाखल करणे म्हणजेच एकप्रकारे आपल्या मातृभाषेचे रक्षण केल्यासारखे असून अशा शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळाव्यातून विद्यार्थ्यांचा सामाजिक, बौद्धिक,भावनिक विकासा बरोबरच सर्वांगीण विकास होत असतो.”असे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते व शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी खारेपाटण केंद्र शाळेतील शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले .
या शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या अनुशंगाणे विविध शैशणिक साहित्य साधनाचे सजावट करणारे आकर्षक टेबल केंद्रातील शालेय शिक्षक यांनी मांडले होते.या प्रत्येक टेबलवर विद्यार्थ्यांना बुद्धीमतेची कस लागणारे खेळ तसेच शैशनिक साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी अमोल भंडारी सर सौ.कट्टी यांनी मनोगत व्यक्त केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल तुपवीरे सर यांनी केले.तर प्रास्तविक अनिल खोत सर यांनी केले.व आभार आमरीन शेख यांनी मानले.