किल्ले गगनगड येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची करण्यात आली उभारणी

शिवशौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मुंबई परिवार या संस्थेने घेतला पुढाकार

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवशौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मुंबई परिवार व कोकण परिवार यांच्या वतीने संयुक्त रित्या नुकताच रविवार दि.१२ मे २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गागणबावडा येथील किल्ले गगनगड येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ गगनगड किल्ल्याचे ट्रस्टी संजयसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उभारण्यात आला.

यावेळी दुर्गसेवक, धारकरी बंधू, रणरागिणी, मावळे दिगंबर राऊत, अजित कुडकर, प्रसाद भोई, गणेश माने, साई इंगळे, सुजित शेंगाळे, साक्षी इंगळे, अमामिका भगत, प्रवीण शेंगाळे, दशरथ इंगळे, देविदास शेंगाळे आदी मान्यवर तसेच वारकरी मंडळी व गडावरील सेवेकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर,गगनबावडा येथील श्री शेत्र गगनगिरी महाराज आश्रम व किल्ले गगनगड येथे प्रारंभी हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली.व त्याची विधीवत पूजा करून किल्ले गगनगड येथे कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविन्यात आला. शिवशौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या मुंबई परिवार व कोकण परिवाराच्या वतीने दरवर्षी गड किल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवून किल्याची साफ सफाई व स्वच्छता केली जाते.तर किल्ले गगनगड येथे या संस्थेच्या वतीने नुकत्याच उभारण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारणीच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!