महाराष्ट्राचे मिंदे सरकारचे प्रशासकीय धोरण पालथे , एका वादळात मुंबई चे प्रश्न ऐरणीवर – संदीप सरवणकर

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर होर्डींग दुर्घटनेबद्दल बोलताना ,श्री संदीप सरवणकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली की, “गेले दोन वर्षे मुंबई महानगर पालिकेला लोक प्रतिनिधी शिवाय बेवारस ठेवणारे, मिंदे सरकार हे च कालच्या घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटना ला जबाबदार आहे. एवढ्या मोठ्या होर्डींग ची स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक होती.जी पडल्या मुळे आतापर्यंत १३ निष्पाप लोकांचा प्राण गेला. व ७५ लोकांना जखमी व्हावे लागले. खरतर, असे होर्डिंग्ज वर राज्य सरकार , हायवे अथॉरिटी, महानगरपालिका या प्राधिकरणाचे नियत्रंण हवे होते. परंतु सर्व अधिकार आपल्याकडे राखून ठेवण्याचे नादात मिंदे सरकारनी मुंबई कराचे आपत्कालीन दुर्घटनेचे वेळी निर्माण होणारे सर्व प्रश्न हे ऐरणीवर ठेवल्याचे दिसून आले. भाजपा चे किरीट सोमय्या सारखे प्रसिध्दी लोलुप नेते तर , प्रशासनाचे कामात विनाकारण लुडबुड करून स्वतःचे शूटिंग करण्याचे नादात त्यांचे कामात अडथळा आणत होते. हे सर्व जनतेने पाहिले. संवेदनशीलता ही रसातळाला गेली की काय? असे वाटू लागले होते.त्यात मा. मुख्यमंत्री यांनी मृतःचे नातेवाईकांना ५ लाखाचे मदत देऊ केली खरी , परंतु , प्रशासनाचे चुकीमुळे घरातील कमवता पुरुष गमावून त्याचा हा मोबदला फारच तोकडी चा होता.हे त्यांना कोण सांगेल.”

error: Content is protected !!