हातकणंगले (प्रतिनिधी) : महिलांकडून झालेल्या मारहाणीबाबत लावलेली बातमी आपल्या विरोधात लावली म्हणून मुरगुड ( ता.कागल ) येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी साथीदारांसह भरचौकात अर्वाच्य शिवीगाळ करून फरफटत नेऊन मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. यांचे संतप्त पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटले .हातकणंगले तालुक्यातील पत्रकाराच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला . दरम्यान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करतानाही पोलिस ठाण्याबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारांवर दहशत आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादार यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी या मागणीसाठी हातकणंगले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी जमादार यांच्याविरोधात पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी केली. माझ्यासंबंधीची बातमी का छापली म्हणत राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी मुरगुड येथे प्रकाश तिराळे ‘ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तिराळे यांच्या तक्रारीवरून जमादार यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. तर जमादार यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी यासाठीचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी हातकणंगले तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते
हातकणंगले मध्ये पत्रकार मारहाणीचे संतप्त पडसाद : कडक कार्यवाहीची केली मागणी











