फोंडाघाट (प्रतिनिधी) : सतत ट्रॅफिक समस्या असलेल्या फोंडाघाट बाजारपेठ मध्ये वाहतूक पोलिसांनि सरप्राइज व्हीजीट देत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मुळे वाहनधारी युवकांमध्ये खळबळ उडाली. अशीच कार्यवाही सातत्याने होऊन आडमुठ्या वाहन चालकांवर कारवाई व्हावी आणि बाजारपेठेतील रस्ता वाहतूक कोंडी मुक्त व्हावा अशी अपेक्षा पादचारी दुकानदार आणि पर्याटकांमधून मधून होत आहे.













