हळवलसह आजूबाजूच्या गावांमध्ये झाडे, घरांचे पत्रे पडून नुकसान
अनेक रस्ते झाडे पडून बंद ; स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही हालचाल नाही
कणकवली (प्रतिनिधी) : शहरात आज दुपारी जोरदार वादळ आणि पाऊस कोसळला. वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे पोल, विद्युत तारा, घरांवरील पत्रे, रस्त्यावर झाडे पडून रस्ते बंद झालेत. हळवल भाकरवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाडीत जाणारा रस्ता बंद झाला होता. मात्र उशिरापर्यंत येथील झाड बाजूला करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही हालचाल झालेली नाही. तर येथे काही शेत घरांचे पत्रे वाऱ्याने उडून गेले तर काही पत्रे फुटले होते.हळवल मुख्य मार्गावर देखील झाड पडल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.











