विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी भुईबावडा येथील युवकावर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी संतोष सीताराम देसाई (40) रा. भुईबावडा रिंगेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी 7.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार पीडित महिला अंघोळीला गेली असता आरोपीत याने तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत सदर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला हवालदार प्रीती शिंगारे करीत आहेत.

error: Content is protected !!