अघोरी चंड भैरव दशावतार नाट्य प्रयोग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर बाजार येथील साई मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे मंगळवार दिनांक 21 मे रोजी साई भंडारा व सत्य नारायण महापूजेचे आयोजन केले आहे. त्या निमित्त सकाळी 8 वाजता साई मूर्तीवर लघुरुद्र, सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा, 1 ते 3 यावेळेत महाप्रसाद, संध्याकाळी 7वाजता स्थानिक सुस्वर भजने, रात्रौ 10 वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण मामा मोचेमांडकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा “अघोरी चंड भैरव” नावाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे तरी भाविकांनी, नाट्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई समिती चिंदर बाजार यांनी केले आहे.












