न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट ची उज्वल यशाची परंपरा कायम ; एच. एस. सी परीक्षेचा ९८:२१ टक्के निकाल

परीक्षार्थी- मार्गदर्शक- शिक्षक वर्ग आणि पालकांचे मुख्याध्यापक व संचालकांकडून अभिनंदन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट एच. एस. सी परीक्षा- फेब्रुवारी /मार्च 2024 चा निकाल 98:21% लागला असून, 280 पैकी 275 विद्यार्थी- विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल परीक्षार्थी- मार्गदर्शक-शिक्षक वर्ग आणि पालकांचे मुख्याध्यापक आणि संचालकांनी हार्दिक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या प्रशालेत कला विभाग कु.कदम किरण किशोर 76%, कु.चेतार साक्षी प्रकाश 75.33%, कु.जाधव अस्मिता सुनील 75.13%, कॉमर्स विभाग — चव्हाण नितेश गजानन 86.50%. कु लाड अक्षता अजित 83.33%, कु.गोसावी तन्वी अविनाश 81.33%, कु. लाड सानिका सुनील 81.33%, व्होकेशनल विभाग — कु.बाणे अपूर्वा विनायक 86%, कु.गुरव सुहानी राजेंद्र 84.17%, कु.घाडी पुष्पा मंगेश 81.50%, कु.घाडी तन्वी राजेंद्र 81.50%, सायन्स विभाग– कु.मुणगेकर दूर्वा नंदकुमार ८२.५०% ., कु.राणे ऐश्वर्या मनोहर ८२.१७ %, कु.सरंगले दिव्या नंदकुमार 81.33% या प्रमाणे गुणाअनुक्रमे आहेत… पंचक्रोशीत सर्वांचे अभिनंदन होत आहे…

error: Content is protected !!