राधाकृष्ण चषक साभिनय नाट्यगीत स्पर्धेत खारेपाटणच्या प्राजक्ता ठाकूरदेसाई हीचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राधाकृष्ण चषक या सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२४ मध्ये खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालयाची विद्यार्थिनी प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करत सुयश प्राप्त केले आहे.तिच्या या संगीत शेत्रातील यशाबद्दल प्राजक्ता हिचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक केले जात आहे.

प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने या गायन स्पर्धेत ‘संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकातील ‘नर वर कृष्णासमान हे नाट्यगीत अतिशय उत्तमरीत्या सादर केले. प्राजक्ताच्या गायनाने ख्यातनाम परीक्षक व आघाडीच्या शास्त्रीय गायिका विदुषी श्रुती सडोलीकर व रसिक मंत्रमुग्ध झाले. तर या स्पर्धेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.या स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये मालवण येथील संगीत अलंकार अँड. दिलीप ठाकूर, ख्यातनाम निवेदक संजय कात्रे, संगीततज्ञ सतिश शेजवलकर, संस्थेच्या संचालिका वीणा दळवी, जेष्ठ तबला वादक प्रसाद मेस्त्री व अन्य मान्यवर उपस्थित होते.तर खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदिप पेंडूरकर सर यांचे प्राजक्ताला अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

प्राजक्ता हिच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,सचिव श्री महेश कोळसुलकर सर्व संचालक मंडळ सदस्य शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने प्राजक्ता हिचे व तिचे पालक यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!