वैभववाडी (प्रतिनिधी) : जगामध्ये सगळंच अनित्य आहे. चार आर्य सत्य आणि पंचशीलाचे आचरण केले पाहिजे. दहा पारमिताही अंगिकारले पाहिजे. दुःखाचे कारण तृष्णा आहे. दुःख मुक्तिचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला विज्ञानवादी बौद्ध धम्म दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांनी अनुकरण केले पाहिजे. सध्या जगाला बौद्ध धम्माचीच गरज आहे. प्रतिपादन धम्मचारी जिनचित्त यांनी केले.
खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई/ ग्रामीण,रमाई महिला मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम निमित्त खांबाळे बौध्दवाडी येथे बोलत होते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक बुद्धपुजापाठ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई शाखेचे युवा शिलेदार राहुल कांबळे आणि अंकिता जाधव यांनी ज्युनिअर केजी ते बारावी पर्यंत शिकत असलेल्या एकूण ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.मुंबई अग्निशमन दल प्रमुखांच्या हस्ते ‘उत्कृष्ट कर्मचारी’ हा बहुमान मिळाल्याबद्दल मुंबई सहसचिव हरिश्चंद्र जाधव यांचा मंडळाच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ देऊन मंगेश लोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुंबईतील नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत वरीष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) पदी नियुक्ती झाल्याबद्दल अनंत कांबळे यांनाही शाल,पुष्पगुच्छ देऊन मंगेश लोके यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी विचारमंचावर शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके,सरपंच प्राजक्ता कदम,ग्रामीण शाखेचे अध्यक्ष दीपक आत्माराम कांबळे,वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ मुंबईचे माजी उपाध्यक्ष भगवान कांबळे,मुंबई सहसचिव हरिश्चंद्र जाधव, प्रदीप कांबळे,राजु सखाराम कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललित जाधव,रामचंद्र कांबळे,सुरेश कांबळे,मंगेश कांबळे,अजित जाधव,बाळकृष्ण कांबळे,प्रभाकर कांबळे,राहुल कांबळे,नितेश जाधव,रोहन कांबळे,तुषार कांबळे,विशाल श्रीनंद कांबळे,अविनाश कांबळे,निखील कांबळे,पार्थ कांबळे,अभिषेक कांबळे,रोहित कांबळे,सम्यक कांबळे,राज कांबळे,शुभम कांबळे,सुनीता कांबळे,अरुणा कांबळे,विवेक कांबळे,वृषाली कांबळे,अपर्णा जाधव,शिल्पा कांबळे,दीप्ती कांबळे,मनस्वी कांबळे,प्राची कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रामीण सरचिटणीस रुपेश कांबळे यांनी केले.












