आखवणे भोम पुनर्वसन क्षेत्रात ताबा पावती ग्राह्य धरून वादळ नुकसान भरपाई द्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे आखवणे भोम पुनर्वसन गावठाणतील फळ झाडांचे मोठे नुकसान आहे. मात्र पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्ताचे नावे अद्याप सात बारा नसल्यामुळे पंचनामा करताना तांत्रिक अडचण येत आहे. जोपर्यंत सात बारा होत नाही. तोपर्यंत ताबा पावती ग्राह्य मानवी. अशी मागणी अरुणा धरग्रस्तानाकडून करण्यात येत आहे.

अरुणा धरण प्रकल्पतील विस्थापित धरणग्रस्ताचे सन २०१९ साली मांगवली, उंबर्डे, कुसर व हेत किजळीचा माळ येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसानातील धरणग्रस्ताना मिळालेल्या भूखंडत छोटेसे घर बांधून उर्वरित जागेत फळ झाडांची लागवड केली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी पावसाने आखवणे भोम पुनर्वसन गाठाणतील धरणग्रस्तानी लावली काजू, आंबा सारखी फळ झाडे उमळून पडली आहेत. याचा पंचनामा करण्याची मागणी धरणग्रस्थाकडून करण्यात होती. त्यानुसार कृषी विभागाकडून पंचनामे करण्यासाठी संबंधित कृषी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. मात्र पंचनामा करताना सात बारा नसल्यामुळे पंचनामा कसा करायचा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी धरणग्रस्ताने तुम्ही अगोदर पंचनामे करा आम्ही या संदर्भात तुमच्या वरिष्ठांशी बोलू असे सांगितल्यानंतर पंचनामे करण्यात आले आहेत.

पुनर्वसनातील नुकसानग्रस्त धरणग्रस्तांना सात बारा मिळे पर्यंत त्यांना मिळालेल्या ताबा पावती ग्राह्य धरावी अशी मागणी केली जात आहे.

दोन वर्षापूर्वी वादळामुळे नुकसान झालेल्या घरांची नुकसान भरपाई ही ताबा पावती घेऊन पंचनामा करून देण्यात आली होती. त्याप्रमाणे फळ झाडांची नुकसान भरपाई ताबा पावती ग्राहय धरून करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!