गौरेश आनंद पारकरचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्यावतीने सत्कार

आयडियल स्कूल मध्ये दहावी परीक्षेत सर्वप्रथम येत गौरेश ने मिळविले यश

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील गौरेश आनंद पारकर याने दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवत आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये पहिला आत्याबद्दल त्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विद्याधर तायशेटे, कल्याण पारकर, भाई परब, आनंद पारकर, हिर्लेकर, चेतन मुंज, प्रसाद बिडये, भाई साटम, मिलिंद मेस्त्री, सर्वेश दळवी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी गौरेश पारकर याचे अभिनंदन करत त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!