कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गाेवा महामार्गापासुन हाकेच्या अंतरावरील स्वामी संकुल कलमठ गावडेवाडी येथे शनिवार दि.1 जुन राेजी श्री सत्यनारायन महापुजेचे आयाेजन करण्यात आले आहे.त्यानिमित धार्मिक कार्यक्रम आयाेजित केले आहेत.सायंकाळी 4.30 ते 7.30 वा. श्री सत्यनारायण महापुजा,रात्री 8.30 ते 10 वा.आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद. तसेच श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त महिलांसाठी खास आकर्षण लाेरे नं 1 नरामवाडी येथील श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ (महिलांचे) बुवा रिया -मेस्त्री, गुरवर्य बुवा- राजेश मेस्त्री, पखवाज- मिलींद लाड, तबला- संकेत पवार यांचे भजन हाेणार आहे.
श्री सत्यनारायन महापुजेचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी संकुलनातील परीवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.










