आ.रवींद्र फाटक यांची पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड

शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नियुक्ती

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : देवगडचे सुपुत्र आ.रवींद्र फाटक यांची शिवसेना पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. रवींद्र फाटक यांची निवड जाहीर केली आहे. देवगड तालुक्याचे सुपुत्र असलेल्या रवींद्र फाटक यांच्यावर पालघर सह रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीची मोठी जबाबदारी पक्षनेतृत्वाकडून सोपविण्यात आली आहे.

error: Content is protected !!