वेगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफैक्चरर्स असोसिएशनची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 5 मार्च रोजी झाराप, नेमळे ब्रीज जवळील “होटल आराध्य” (कुडाळ) येथे आयोजित केलेली आहे. या सभेमध्ये काजू उद्योगाला आवश्यक असणारे वेगवेगळ्या मशीनरीचे 26 स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासभेस महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या व्यासपीठावर कर्नाटक कॅश्यु असोसिएशनचे आजी-माजी 4 अध्यक्ष, गोवा कॅश्यू असोसिएशन अध्यक्ष, ओरिसा कॅश्यू असोसिएशन अध्यक्ष असे हे सर्व महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष समवेत उपस्थित राहणार आहेत.
या सर्वात मोठ्या संधीचा फायदा सदरचे प्रदर्शन हे महाराष्ट्रातील काजू उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व काजू उद्योजकांच्या ज्ञानात भर पडणार आहे. ही संधी न गमावता आपल्यासोबत नवीन उद्योगांना असोसिएशन सभासद करून घेणार आहे. सर्वांनी सभासद वाढविण्यासाठीची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील काजू संघटना मजबूत होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र कॅश्यू मँनुचरर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते फेडण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नितेश राणे यांनी याबाबत केलेल्या प्रपन्नाला यश आले असून कोकणातील काजू प्रक्रिया उद्योजकांनी त्यांचे आभार मानले आहेत.