साखरे नाटे येथे वीज पडून मृत्युमुखी झालेल्या मुबस्सम सोलकरे यांच्या कुटुंबीयांना किरण सामंत यांच्याकडून मदतीचा हात

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील साखर नाटे येथील मुबस्सम सोलकर यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. होता ही बाब देवाचे गोठणे विभागातील शिवसेना पदाधिकारी यांनी रत्नागिरी शिवसेना नेते प्रसिद्ध उद्योजक आणि सिंधू रत्न समृद्ध योजनेच्या संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कानावर हि घटना कार्यकर्ता यांनी घातली किरण सामंत यांनी लगेच साखरी नाटे येथे जाऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समवेत सोलकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली झालेल्या घटनेची सविस्तर चौकशी केली यावेळी किरण सामंत त्यांनी सोलकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अश्फाक हाजू, राजू कुरूप, देवाचे गोठणे विभाग प्रमुख मनोज आडविलकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमजद बोरकर, साखरे नाटेचे सरपंच संदीप बांदकर, उपसरपंच नौशाद धाळवेलकर , व्यापारी संघटना अध्यक्ष रमेश लांजेकर, शहादत हबीब, मिर्झा पावसकर, वजूद बेबजी,नाटे गावचे आदिल म्हस्कर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!