अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र परब यांची निवड.

चौके (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघ श्रेष्ठींच्या संमत्तीने राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांनी काळसे गावचे सुपुत्र राजेंद्र लवू परब यांची मालवण तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड केली.

दरम्यान ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या “पुढचे पाऊल ” या पुस्तकाचे अनावरण तसेच मराठा समाजाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जिल्हास्तरीय परिषद व नूतन जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दिनांक १७ जून रोजी कुडाळ येथे पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देउन सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त शिक्षक व माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब यांची मालवण तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत , उद्घाटक सेवानिवृत्त शिक्षक धोंडू रेडकर,ॲड. राजेंद्र रावराणे,ॲड. उमेश सावंत, आदी मान्यवर व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!