भुईबावडा घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून वाहतूक केली सुरळीत…!

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस दमदार पाऊस सुरु आहे. या पावसाने भुईबावडा घाटात दरड कोलसल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. पावसामुळे दोन्ही घाटात पडझडं सुरु आहे. सध्या करूळ घाट नूतनीकरणासाठी बंद असून याच घाटावर वाहतूकीची पूर्णपणे मदार आहे.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात गुरवार पासून जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर असून या पावसाने गगनबावड्या पासून मागे सुमारे २ की. मी. अंतरावर दरड रस्त्यावर पडली होती.त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.

गेले सहा महिने करूळ घाट नूतनिकरांच्या कामासाठी बंद आहे. करूळ घाटातील वाहतूक भुईबावडा घाटातून वळवण्यात आली आहे.त्यामुळे वाहतूकीचा सर्व भार हा सध्या भुईबावडा घाटावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक या घाटावर अवलंबून आहे.

error: Content is protected !!