वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय, सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी तिथवली येथे ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन सरपंच प्रियांका हरयाण यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसंबंधी माहिती व शेतातील अडचणी व त्यावरील उपाय, शेतकरी यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, बागायती शेती, पशुपालन, फळबाग लागवड व सरकारी योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले,या कार्यक्रमाचे आयोजन सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाचे कृषिदूत सिद्धेश वारीक, अनिकेत मारकड शुभम राऊत, ऋषिकेश भोंग, कौशल पाताडे, ओवेश संसारे, वैभव बंडगर, सुशांत तायडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक पी. एस. सावंत,या कार्यक्रम प्रसंगी सरपंच व इतर सदस्य यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. प्राध्यापक पी. डी. काळे, सहाय्यक प्रा. एन. आर. फुटाणकर, प्रा. एस. व्ही. जुवेकर, प्रा. गोळणकर यांचे मार्गदर्शन लाभले.