लोरे नं १ ग्रामपंचायत येथे कृषी कन्यांनी घेतला इन्फार्मेशन कार्नर

वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय, सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी लोरे नं १ येथे ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन  सरपंच अजय रावराणे यांच्या हस्ते झाले.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसंबंधी माहिती व शेतातील अडचणी व त्यावरील उपाय, शेतकरी यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, बागायती शेती, पशुपालन, फळबाग लागवड व सरकारी योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले,या कार्यक्रमाचे आयोजन सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाचे कृषिकन्या सोनम वाघमारे, आनंदी बनसोडे,चेतना पोतदार,आकांक्षा सोनवलकर,अध्यात्मिका कर्णिक,सेजल मेंढे,आदिती नाईक यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक पी. एस. सावंत, सहाय्यक प्रा. एन. आर. फुटाणकर, प्रा. एस. व्ही. जुवेकर, प्रा. गोळणकर, प्राध्यापक पी. डी. काळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच व इतर सदस्य यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.कृषीकन्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

error: Content is protected !!