वैभववाडी रेल्वे स्टेशननजीक परप्रांतीय युवकाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह

मृतदेहालगत महागड्या आयफोनसह आधारकार्ड पॅनकार्ड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वेस्टेशन नजीक परप्रांतीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. धीरजकुमार सुकदेव मिंज रा. छतिसगड असे या तरुणाचे नाव आहे. शनिवार सायंकाळी हा मृतदेह सापडला आहे. त्याचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
   
वैभववाडी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर कणकवलीच्या दिशेकडे गटारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या  स्थितीत ग्रामस्थांना आढळून आला. याबाबत नापणे  पोलीस पाटील यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनला माहिती दिली. वैभवाडी सहाय्यक  पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल  ज्याने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. अंदाजे तीन-चार दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मृतदेहाच्या बाजूला महागडा आयफोन  तसेच आधार कार्ड व पॅन कार्ड आढळून आले. यावरून त्याचे नाव व पत्ता सापडला असून या आधारे पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह सेवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे या तरुणाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजू शकले नाही.

error: Content is protected !!