राज्य शासनाची आनंददायी शनिवार संकल्पना
आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीतील विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा हा उपक्रम शनिवारी आज राणेवाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. प्रशालेतील बहुतांश मुले ही शेतकरी कुटुंबातीलच आहेत. मात्र शाळेतील सर्व विध्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित सहभागातील हा अनुभव सर्वांसाठी अनोखा व आनंददाई असाच ठरला.
शेतकरी अन्न पिकवतात, आपले पोषण-पोषण करतात. शेतकरी आपले मित्र आहेत. ही आपुलकीची, आदरांची भावना मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. तसेच सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहितीही मिळावी या हेतूने राज्य शासनाच्या आनंददायी शनिवार या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा हा उपक्रम रबावला. शेतकऱ्यांशी संवाद साधतं माहिती जाऊन घेण्यात आली. भात लावणी तसेच शेती बाबत प्रत्यक्ष अनुभव सर्वच मुलांनी एकत्रित अनुभवला. शाळा व्यवस्थापन समिती, शेतकरी या सर्वांच्या सहकार्यातून उपक्रम यशस्वी झाला.
या उपक्रमात स्वाती सुर्वे, धनश्री गोसावी, सुहासिनी गोसावी, मानसी गोसावी, हडकर, प्रिती कांबळी, रेश्मा हडकर, शाळा मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड तसेच पालकवर्ग सहभागी होते.