वैभववाडी तालुक्यात ढगफुटी सदृश जोरदार पाऊस,सुख-शांती नदिच्या पाणी पातळीत वाढ

तालुक्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली तर काही ठिकाणी शेतीचेही नुकसान

शहरातील रस्ते जलमय तर बाजारपेठेत पाणीच पाणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज दुपार पासून वैभववाडी तालुक्यात सर्वत्र जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी सुख व शांती नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक गावांमधील कॉजवे पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी भात शेतीच्या मळ्यात नदिचे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. दुपार पासून सुरू असलेला हा ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. वैभववाडी शहरातील रस्ते देखील जलमय झाले आहे.

error: Content is protected !!