चिंदर ग्रामपंचायत मध्ये “माझी लाडकी बहीण” योजना मोफत नोंदणी शिबीर संपन्न !

गावातील पात्र लाभार्थी महिलेलानां लाभ देण्यासाठी प्रत्येक महसूल गावात मोफत शिबीराचे आयोजन-उपसरपंच दिपक सुर्वे

आचरा (प्रतिनिधी) : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत. या योजनेचा चिंदर गावातील जास्तीत जास्त पात्र महिलांना लाभ होण्यासाठी चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नोंदणी शिबीर संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी काल (6जुलै) 11 वाजता छोटेखानी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला यावेळी हडी गावचे माजी सरपंच तथा भाजप नेते महेश मांजरेकर यांनी उपस्थित महिला वर्गाला योजने बाबत सविस्तर माहिती दिली.

उपसरपंच दिपक सुर्वे यांनी उपस्थित महिलांना आश्वासन दिले कि गावातील प्रत्येक महिला भगिनीं पर्यंत हि योजना पोचवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक महसूल गावात मोफत कॅम्प घेऊन त्या माध्यमातून करणार आहोत. शिबीरात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मार्फत 180 पर्यंत ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यात आले असून ते घरोघरी जाऊन ऑनलाईन करून घेणार आहेत. अशी माहिती सरपंच नम्रता महंकाळ व उपसरपंच दिपक सुर्वे यांनी दिली आहे. या कार्यक्रमा वेळी सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, चिंदर बाजार तलाठी संतोष जाधव, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री, महेश मांजरेकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, माजी सभापती हिमाली अमरे, प्रियांका कावले, चिंदर गावातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, लाभार्थी महिला आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!