वैभववाडीत अति मुसळधार पाऊस ; जनजीवन विस्कळित

सुख व शांती नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नद्यांचे पाणी शिरले घरांमध्ये

अनेक कॉजवे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील संपर्क तुटला

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज दुपार पासून वैभववाडी तालुक्यात सर्वत्र जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी सुख व शांती नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक गावांमधील कॉजवे पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. सोनाळी येथे नदिचे पाणी घरात घुसल्याने अनेकांची धावपळ उडाली आहे तर अनेक ठिकाणी भात शेतीच्या मळ्यात नदिचे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. दुपार पासून सुरू असलेला हा ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. वैभववाडी शहरातील रस्ते देखील जलमय झाले आहे.

वैभववाडी उंबर्डे मार्गावर सोनाळी, कुसूर बौध्दवाडी, येते रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा रस्ता बंद होता. तर तिथवली जमादा पुलावरून पाणी जात असल्यामुळे खारेपाटण गगनबावडा राज्य मार्ग ठप्प झाला होता. तिथवली येते एक घर कोसले आहे.तर अनेक घरात पाणी शिरले आहे. वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.12 मध्ये गटाराचे पाणी वैभववाडी नावळे रस्तावर आले होते. तर अनेक घरात पाणी धुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. अरुणा धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून अरुणा नदी काठाच्या गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या काही दिवस तुरळक पाऊस पडत होता. शनिवार रात्री पासून तालुक्यात जोरदार पावसाला सुरवात झाली. रविवारी सकाळपासून तर तालुक्यात अतिवृष्टी सुरु झाली. या पावसाळी हंगामातील हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे. या पावसाने तालुक्यातील अनेक कॉजवे, पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वैभववाडी उंबर्डे मार्गावर सोनाळी इंग्लिश मिडीयम स्कुल, सोनाली गावाळदेव, कुसूर बौध्दवाडी येते रस्त्यावर पाणी आल्यामुळे सायंकाळी वाहतूक ठप्प झाली होती. तर खारेपाटण गगनबावडा मार्गावर तिथवली जामदा पूलावर पाणी आल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती.त्याचप्रमाणे वेंगसर येते रस्तावर पाणी आल्यामुळे वेंगसर मौदे मार्ग बंद होता. त्याचप्रमाणे दिगंशी व तिरवडे तर्फ खारेपाटण येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक वाड्या वस्त्यांचा थेट संपर्क तुटला आहे.त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली होती.

तिथवली गावंदरवाडी येथील कुडाळकर यांच्या घर कोसले आहे. तर शौकत सोलकर यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे.या पावसाने वैभववाडी शहरातील प्रभाग क्र. 12 मध्ये गटाराचे पाणी वैभववाडी नावळे मार्गांवर आले होते. यामुळे अनेक घरात पाणी शिरलेमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. संदीप पाटील, रविदिप पाटील, श्री लसने, अशोक पाटील यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली.

error: Content is protected !!