कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी प्रशालेत अहिल्याबाई होळकर मोफत बस पासचे वितरण करण्यात आले.
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना शैक्षणिक गरजवंतासाठी राज्य शासनातर्फे खास विद्यार्थिनींसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शाळेत जाण्यासाठी एसटी ने मोफत प्रवास सवलत लागू केली आहे.
ग्रामीण भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक ठिकाणापासून सोयीच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवास व्हावा आणि मुलींना शिक्षण घेताना प्रवासामुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत प्रत्यक्ष माध्यमिक विभागातील १०५ विद्यार्थ्यांनींना व उच्च माध्यमिक विभागातील ११६ विद्यार्थिनींना कणकवली आगारामार्फत मोफत पास चे वितरण करण्यात आले. या कामी शिवन्या शिवराम वाळवे (एस टी महामंडळ, वाहतूक नियंत्रक, कणकवली),दिलीप शांताराम जाधव (एस टी महामंडळ,वरिष्ठ लिपिक कणकवली), तसेच महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ, कणकवली, आगार प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. या योजनेचे प्रशाले अंतर्गत काम पाहणारे कर्मचारी सुनिता कांबळे मॅडम, व वैदही प्रभू मॅडम यांनी बस पास मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या विशेष योजनेसाठी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन आर.एच. सावंत सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण,प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक,विद्यार्थी यांनी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ, कणकवली यांचे विशेष कौतुक केले..