सिंधुदुर्ग सेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या पाहणी दौऱ्यानंतर अपघात टाळण्यासाठी तातडीने कारवाई.
अवजड वाहन चालकांमध्ये संभ्रम तरीही चिरा-वाळू- कंटेनर यांची वाहतूक सुरू.
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज दुपारी अचानक सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी फोंडाघाट घाट रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत उपकार्यकारी अभियंता साै.प्रभू , माधवी दळवी, संजना कोलते, सुरेश टक्के, संतोष टक्के, सुंदर पारकर इत्यादी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच 59/60 किमी अंतरावर रस्त्याच्या वळणावरील संरक्षण भिंत कोसळली. तर गेल्या तीन दिवसात 61/62 किलोमीटर अंतरावरील मोरी चा पाईप खचल्याने त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अवजड वाहनामुळे अथवा येणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीने रस्ताच खचून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच 58 ते 64 किमी अंतरावर वळणावरती खड्डेच- खड्डे पडले आहेत.
याबाबत संदेश पारकर आणि उपस्थित ग्रामस्थांनी प्रभू मॅडम यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. एकमेव बाहेरील ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट बांधकामामुळे आणि अरुंद रस्ता चे वळण रुंद न केल्याने, तसेच जड वाहतुकीमुळे भिंती लगत चा भाग खचून संरक्षक भिंत, आजवर तीन वेळा कोसळली असून,लगत बांधलेली व उभी असलेली भिंत कधीही कोसळण्याच्या प्रतीक्षेत आहे.हे निदर्शनास आणून देताना सदैव सुरक्षित असलेला फोंडाघाट असुरक्षित, निकृष्ट बांधकाम मुळे केला , त्याला जबाबदार कोण ? हे निदर्शनास आणून दिले.
प्रभू यांनी तातडीने अवजड वाहने वाहतूक तातडीने बंद करीत आहोत. कोसळलेल्या संरक्षक भिंती ठिकाणी गॅबियन भिंत (दगडांची तात्पुरती भिंत) उभी केली आहे. या सर्व कामांचे देयक पुढील पक्की भिंत बांधून होईपर्यंत ठेकेदारास देण्यात येणार नाही. सध्या पावसामुळे काम करणे अशक्य असल्याने रस्ता वाहतुकीस सुलभ करण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घेत आहोत. तसेच फोंडाघाट बाजारपेठेतील रस्त्यावरून वाहणारे पाणी बांधलेल्या गटारामध्ये जाईल, अशी व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे.अशी उत्तरे दिली.
त्याप्रमाणे संध्याकाळपासून अवजड वाहनांसाठी घाट रस्ता बंद करून वाहतूक गगनबावडा मार्गे वळविण्यात आली.तरीही संभ्रमित चालकां कडून चिरा-वाळू-कंटेनर -ट्रॉलर वाहतूक सुरू ठेवण्याचे धाडस केले जात आहे….












