मसूरे (प्रतिनिधी) : मुणगे येथील श्री देवी भगवती हायस्कूल या प्रशालेत दरवर्षी पाचवीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नारळाचे रोपं देवून स्वागत करण्याची परंपरा जोपासली जाते. याहि वर्षी टाइम्स ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी रमेश पाटणकर आणि त्यांचे सहकारी यांच्या तर्फे मुलांना नारळाची रोपे देण्यात आली.निसर्गाचे देणं फेडण्याचा संस्कार विद्यार्थ्यांना या उपक्रमातून दिला जात आहे. गेली 4 वर्ष श्री पाटणकर हा उपक्रम राबवत आहेत. यावेळी उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक संस्थाचालक यांनी आभार व्यक्त केले.
रमेश पाटणकर सहकाऱ्यांचा निसर्गाचे देणे फेडणारा उपक्रम!











