मसूरे (प्रतिनिधी) : मनोरमा चौधरी यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुर येथे, विद्यार्थ्यांकरीता चित्रभरण स्पर्धा, दंत चिकित्सा व नेत्र चिकित्साचे आयोजन करण्यात आले होते. रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रंगभरण चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटात वेदांत सचिन तवटे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांत हा श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या कला शिक्षिका गौरी तवटे व जी. प. पदवीधर शिक्षक सचिन तवटे यांचा मुलगा आहे. या स्पर्धेत देवगड ते दोडामार्ग पर्यंतच्या 157 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते श्रीम. मनोरमा चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर, नेरुरच्या प्रथम नागरिक भक्ती घाडीगावकर, वसुंधरा केंद्राचे व्यवस्थापक सतीश नाईक, डॉक्टर मयुरी ठाकूर, डॉक्टर जोशी, सिंधुदुर्ग न्यायालयाचे निवृत्त रजिस्ट्रार मटकर व इतर मान्यवर उपस्थित होते. बक्षीस समारंभ राष्ट्रवादी शरद गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांचे उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हास्तरिय रंगभरण स्पर्धेत वेदांत तवटे प्रथम!












