” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थीनींना मोफत एस.टी.पास चे वितरण

कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांची उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जातात. विद्यार्थींना बारावी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो. या विद्यार्थ्यांना आता एसटीने थेट शाळेत पास वितरीत करण्याची योजना शासनाने आखली आहे. पास थेट तुमच्या शाळेत राज्य एसटी महामंडळाने आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना सध्या अमलात आणली आहे. या योजनेमुळे लाल परीने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थीनींना मोठा दिलासा मिळत आहे. ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” ही विशेष मोहीम सध्या महाराष्ट्रात सर्वत्र राबबली जात आहे. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील एस.टी.ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थीनींना ‘एस टी.पास थेट तुमच्या शाळेत’ या योजने अंतर्गत आज एस टी.पास चे वितरण करण्यात आले.

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत. परिणामी विद्यार्थीनींचा वेळ वाया न जाता वेळेची बचत होत आहे.

१८ जून पासुन एसटी प्रशासनातर्फे ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली होती. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होत आहे. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वैभववाडी वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, लिपिक पी.पी.कोकरे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व लाभार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!