आषाढी एकादशी निमित्त चिंदर कुंभारवाडी शाळेत रंगला बालकांचा दिंडी सोहळा

आचरा (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी शाळेच्या चिमुकल्यांची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम पालखी दिंडीचे स्वागत व पूजन समिक्षा चिंदरकर व सौ. सानिका चिंदरकर यांनी केले. यावेळी उपस्थित रुक्मिणी रूपातील विद्यार्थीनी गार्गी हिने ‘रखुमाई रखुमाई’ गाण्यावर सुंदर नृत्य सादर केली. तसेच सोहम आणि प्रणव यांनी “कानडा राजा पंढरीचा” या गाण्याचा ठेका धरला. त्यांना पखवाज साद वेदांत यांनी दिली. सर्व विद्यार्थी यावेळी आकर्षक वेशभूषेत विठ्ठल नामाचे गजर व जयकार करीत होते.

गावात ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करून पूजन केले. गणेश मंदिरात चिमुकल्यांनी माऊली माऊली विठ्ठल नामाचा गजर केला. उपस्थित महिलांनी व विद्यार्थ्यानी फुगडी घातली. भक्तीगीतावर समूह नृत्य सादर केले.या दिंडीचे यशस्वी नियोजन शिक्षक राजेंद्र चौधरी, भिमाशंकर शेतसंदी, अंगणवाडी सेविका लक्ष्मी चिंदरकर, मदतनीस सारिका चिंदरकर यांनी केले. या दिंडी साठी कुंभारवाडी ग्रामस्थ व पालकांचे सहकार्य व सहभाग लाभले. दिंडीतील विद्यार्थ्यांचे भक्ती उत्साह व शिस्त पाहून गावकऱ्यांनी कौतुक केले.

error: Content is protected !!