नगरोत्थान च्या गटारांची स्वच्छता सुरू
वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान योजने अंतर्गत वैभववाडी शहरात अनेक वॉर्ड मध्ये गटारे बांधण्यात आली आहे. या गटारांची अवस्था कचराकुंडी समान झाल्याचे सहछायाचित्र वृत्त काल आपला सिंधुदुर्ग न्यूज ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेत गटारांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. आठवडा बाजारात प्लास्टिक पिशव्यांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या नगरपंचायतने गटाराच्या शेजारील दुकानांच्या परिसरातील गटारीत प्लास्टिक बॉटल व प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या दुकानांवर देखील दंडात्मक कारवाई केल्यास या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही.
आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या वृत्ताची दखल घेत नगरपंचायत तात्काळ गटारी स्वच्छता करण्यास सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.














