युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिल्या कार्यक्रमास शुभेच्छा
राजश्री साळुंखे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन
कणकवली (प्रतिनिधी) : “प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांती” सदगुरु वामनराव पै व जीवनविद्या मिशन साधना केंद्र कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कणकवली येथे कृतज्ञता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन कणकवली कॉलेज च्या चेअरमन राजश्री साळुंखे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मार्गदर्शन केले. जीवनविद्या मिशन च्या या कृतज्ञता दिन सोहळ्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी कणकवली कॉलेज च्या चेअरमन राजश्री साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, प्रा. हरिभाऊ भिसे, संदीप परब, सागर महाडिक, विजय चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.














