उद्योजक मुदस्सरनझर यांचे स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवस अभिष्टचिंतन

सुवर्णकन्या अक्सा शिरगावकरचाही केला सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : उद्योजक मुदस्सरनझर शिरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. पुष्पगुच्छ देत मुदस्सरनझर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मुदस्सरनझर यांची सुकन्या अक्सा हिने 13 वर्षे वयाखालील गटात राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि 15 वर्षे वयोगटात ब्रॉंझ पदक पटकावले आहे. अक्सा हिची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अक्साच्या या यशाबद्दलही स्वाभिमान प्रतिष्ठान च्या वतीने उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने अक्सा हिला शाल पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले. यावेळी कणकवली तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी सभापती प्रकाश सावंत, उद्योजक अचित कदम, इब्राहिम शेख, आनंद घाडीगांवकर, मंदार मेस्त्री, सोहेल खान आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!