आमदार नितेश राणे विजवितरण अधिकाऱ्यांना देणार शॉक ट्रीटमेंट

पावसाळ्यात विजवितरण ची बत्ती गुल ; 1 ऑगस्ट रोजी प्रहार भवन ला अधीक्षक अभियंत्यांसोबत घेणार बैठक

सरपंच पदाधिकारी जनतेला उपस्थित राहण्याचे केले आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : यंदाच्या पावसाळ्यामुळे कणकवली तालुक्यामधील निर्माण झालेल्या विद्युत समस्यांमुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रहार भवन कणकवली येथे दुपारी 12:30 वाजता आयोजित केली आहे. सदरहू बैठकीसाठी महावितरणचे अधिक्षक अभियंता अशोक साळुंखे आपल्या अधिकारी वर्गासह उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व जनतेने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!