कार्यकारी अभियंता सर्वगोड कार्यतत्परता
श्रेयाचे वाटेकरी होण्यासाठी चढाओढ
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी आपल्या कामातील कार्यतत्परता दाखवत फोंडाघाट मध्ये रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसून दिलासा दिला. फोंडाघाट मधील कार्यकर्ते भाई हळदिवे यांच्या प्रयत्नांना व फोंडाघाट मधील उभाठा शिवसेना कार्यकर्ते यांच्या आंदोलनाला तसेच सेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, यामुळे फोंडाघाट मधील सर्वच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काल फोंडाघाट मधील सामाजिक कार्यकर्ते भाई हळदीवे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत फोंडाघाट मधील रस्त्यांची होत असलेली दुरावस्था आणि ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे याचे वास्तव कथन करत ताबडतोब खड्डे बुजून देण्याची आग्रही मागणी केली होती.त्याचबरोबर फोंडाघाट उभाठा शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्ता रोको व रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या आंदोलन छेडले होते. यादरम्यान सेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी सर्वगोड ना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्व गौड यांनी आंदोलन कर्त्याना आजच्या आज पेवर ब्लॉक बसून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या कामांमध्ये प्रामाणिक व कार्यतत्पर अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी आपल्या कामातील कार्य तत्परता दाखवत काल दुपारनंतर फोंडा घाट मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू करून रात्री उशिरापर्यंत सर्व खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवून दिले कार्यकारी अभियंता सर्वगौड यांच्या या आश्वासनपूर्ती आणि कार्यतत्पर कामामुळे फोंडाघाट मधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच सजग स्थानिक कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या कार्यतत्पुरतेबद्दलही कौतुक होत आहे.
