कासार्डे सोसायटीत भाजपाची शतप्रतिशत बिनविरोध सत्ता
सर्वच्या सर्व 13 जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवारांची बिनविरोध निवड
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंच्या विचारांचा करिष्मा कासार्डे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत चालला असून सर्वच्या सर्व 13 जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातून कासार्डे गावाच्या विकासासाठी चालना देण्यासाठी माजी जि प सदस्य संजय देसाई यांचया नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत उमेदवार विकास सोसायटी निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र विरोधकांनी आपले नामनिर्देशन मागे घेतल्याने अखेर कासार्डे सोसायटीवर पूर्णतः भाजपाची सत्ता आली आहे.नूतन संचालकांत संजय देसाई, दीपक सावंत, रवींद्र पाताडे, रवींद्र घाडी, सहदेव म्हस्के, शांताराम जाधव, माधवी पाळेकर, ललिता तेली, दीपक गुरव, विजय कोलते, नितीन लाड, विनोद बंदरकर, घोळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. खांडेकर यांनी काम पाहिले.