खारेपाटण (प्रतिनिधी) : महिलांनी बचत गटांच्या माध्मामातुन संघटित होऊन.स्वतःच्या पायावर उभे राहत. आपला विकास साधावा. तसेच समाजातील सर्व स्तरातील महिलांनी एकत्र येत मोठा उद्योग व्यवसाय सुरू करून खारेपाटण चे नाव उज्ज्वल करावे. असे भावपूर्ण उदगार खारेपाटण गावच्या सरपंच प्राची इसवलकर यांनी ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण व जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना काढले.
जि.प.केंद्र शाळा खारेपाटण न.१ या शाळेच्या सभामंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वनाने व क्रांतिज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर,खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर,ग्रा.पं.सदस्या शितीजा धुमाळे,अस्ताली पवार,मनाली होनाळे,अमिषा गुरव,दक्षता सुतार,ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर,कृषीसेवक सागर चव्हाण,महीला बचत गटाच्या सी आर पी युती पोमेडकर, साक्षी तुरळकर,आस्था पाटणकर,उर्मिला सुतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खारेपाटण केंद्र शाळेच्या मुलींनी यावेळी विविध वेशभुषा परिधान करून कर्तुत्ववान महिलांनी जागतिक पातळीवर असलेली ओळख अभिनयातून साकारली. मुलांच्या या कलागुणांचे उपस्थितानी कौतुक केले. तर रीहाना काझी,प्रज्ञा उन्हाळकर,यांना उद्योगशिल महीला म्हणून सत्कार करण्यात आला. तर सन्मती ब्रम्हदंडे यांचा शिक्षण शेत्रातील योगदान बद्दल सत्कार करण्यात आला.सुवर्णा पाटणकर व विशाखा पाटणकर या महिलांचा स्वच्छतेतील अनमोल कार्यबद्दल गौरव करण्यात आला.
तसेच महिला दिना निमित्त खारेपाटण मधील साजराई महीला बचत गट व श्री समर्थ बचत गट या दोन महिला बचत गटाचा त्यांच्या उद्योग व्यवसायातील उत्तुंग भरारी बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
तर खारेपाटण मधील महालक्ष्मी समूह बचत गट श्री गणेश बचत गट,फातिमा बचत गट,खुशी बचत गट,गणेश कृपा बचत गट,सखी महीला बचत गट या सर्व बचत गटानी आपल्या व्यवसायात प्रगती केल्याबद्दल त्यांचा सत्कार खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी संतोष पाटणकर, सागर चव्हाण अडव्होकेट शितिजा धुमाळे,अंजली कुबल, ग्रा.प.सदस्या मनाली होनाळे, अस्ताली पवार,मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आपली मनोगते व्यक्त केली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेच्या शिक्षिका.रेखा लांघी यांनी केले.तर प्रास्ताविक शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना ताळगावकर यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार आस्था पाटणकर यांनी मानले. या कार्यक्रमाला खारेपाटण महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















