कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य महसूल पंधरवढा अभियानाच्या निमित्ताने वागदे येथे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अॅप मध्ये माहिती कशी नोंदवावी ? दरवर्षी पीक पाहणी सातबारा दफ्तरी अॅप वरुन नोंद केल्याचा फायदा काय असतो ? शेतक- यांनी ई पीक पाहणी दरवर्षी केल्यामुळे शेतक-यांकडून येणा-या या बाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे,वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत, निवासी नायब तहसिलदार मंगेश यादव, गोदाम व्यवस्थापक दिलीप पाटील, मंडळ अधिकारी किरण गावडे, तलाठी मंगेश जाधव,ग्रामसेवक युवराज बोराडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक कदम, पोलीस पाटील सुनील कदम व शेतकरी उपस्थित होते.
महसूल पंधरवडा अभियान निमित्त वागदेत ई पीक पाहणी ऍप जनजागृती











