पडेल भाजप मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर

देवगड (प्रतिनिधी) : भाजप पडेल मंडल अध्यक्षपदी विठलादेवी येथील महेश उर्फ बंड्या नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देऊन ही निवड जाहीर केले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी जि.प अध्यक्ष संदेश सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आदींसह भाजप जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!