जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसैनिक म्हणुन बेभान होऊन काम करा – संदेश पारकर

देवगड (प्रतिनिधी) : ऑगस्ट (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह ११ जुलै रोजी सांगता दिवस या अनुषंगाने कणकवली विधानसभेमध्ये फणसगाव येथे भगवा सप्ताहाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तालुकाप्रमुख विभागप्रमुख शाखाप्रमुख, सरपंच, यांच्या बैठकीत मतदार संघाच्या बांधणीत येणाऱ्या अडचणींवर मात करून पक्ष बांधनीबाबत चर्चा करण्यात आली.

संदेश पारकर म्हणाले, सच्या शिवसैनिकानी जनतेच्या प्रश्ननासाठी बेभान होऊन काम करावे. जनता आपल्या नक्की पाठीशी राहील. विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी प्रामाणिक पणां, चिकाटीच्या जोरावर आपलं नेतृत्वसिद्ध करा.यावेळी तालुकाप्रमुख जयेश नर, विभागप्रुख दिनेश नारकर, युवा विभाग अधिकारी सागर गोरूले, शाखा प्रमुख संदीप राणे, देवेंद्र उर्फ तात्या नारकर शाखाप्रमुख दीपक टुकरुल, प्रकाश आडिवरेकर, रवींद्र शिंगे, वसंत धुरी, प्रकाश पाटील, गणेश मेस्त्री, राजाराम राणे, विजय नारकर, महेश पोयरेकर, शांताराम बडबे, आदि शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!