देवगड तालुक्यातील सौंदाळे हेळदेवाडी व तिर्लोट गावातील उ.बा.ठा शिवसेनाच्या ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश

ओम गणेश निवासस्थानी पक्षप्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तिर्लोट व सौंदाळे मधील उबाठाचे कार्यकर्ते विरेश बाळकृष्ण मेरवणकर,सजय पाडुरंग मेरवणकर,भरत रावजी नार्वेकर, जयदास दिंगबर नार्वेकर,सिध्देश अभिमन्यु नार्वेकर,सज्जन कृष्णा वेतकर,प्रशांत देवळेकर,रोहित देवळेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे सौंदाळे व तिर्लोट गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे, आरीफ बगदादी, विशाल पंगेरकर, नार्वेकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!